पुण्यातील डायस प्लॉट झोपडपट्टीतील रहिवासी भास्कर लिंबाजी वाघमारे यांनी वयाच्या ४३व्या वर्षी दहावीची परीक्षा उत्तीर्ण करुन दाखवली. भास्कर यांच्या कामगिरीने कुटुंबात 'कही खुशी, कही गम' असं वातावरण आहे कारण त्यांच्या मुलाला मात्र परीक्षेत यश आलेलं नाही. (रिपोर्टर- अक्षय बडवे)